मुंबई : मुंबईतले रस्ते गाड्यांनी आणि फुटपाथ फेरीवाल्यांनी भरलेत, सर्वसामान्य माणसानं चालायचं कुठे? अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालय़ाने शहरातील अतिक्रमणांना फटकारलय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबादेवी मंदिराबाहेरील फेरीवाल्यांनी पालिकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर निरीक्षण नोंदवताना हायकोर्टाने पालिकेच्या कारवाईचे समर्थन केलय.  


मुंबईकरांना श्वास घ्यायलाही आज स्वच्छ हवाही उपलब्ध नाही. महानगर पालिका अतिक्रमणं हटवण्यास बांधील असल्याचं मत नोंदवत हायकोर्टाने फुटपाथवरील दुकांनदारांना कडक शब्दात समज दिलीय.  


महापालिकेच्या कारवाईवेळी गेली ३० वर्ष त्याच जागी कार्यरत असल्याचा याचिकाकर्त्यांनी दावा केला होता. अचानक कारवाई करण चुकीचं असल्याचा याचिकाकत्यांचा आरोप होता. त्यावर शहरातील अतिक्रमणाना फटकारत कोर्टाने महापालिकेच्या कारवाईच्या समर्थनार्थ मत नोंदवलय.