मुंबई : सरकारच्या चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे ओढलेत. चारा छावण्या बंद करण्याचं कारण सांगा असे स्पष्ट निर्देश मंगळवारी मुंबई हायकोर्टानं दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चारा छावण्यांच्या बाबतीत सरकारचा दुटप्पीपणा कोर्टात उघडा पडला. दुष्काळामुळे गेल्या दीड महिन्यात १२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी २० आत्महत्या उस्मानाबादमध्ये झाल्याची माहिती स्वतः सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलीय.  


याआधी बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात रब्बी हंगामात मुबलक चारा उपलब्ध झालाय. त्यामुळं मेपर्यंत चा-याची अडचण नसल्याचा दावा राज्य सरकारनं केला होता. त्यामुळे येथील चारा छावण्या बंद कऱण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.