मुंबई : 14व्या मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झालीय. सीएसटीवरुन 42 किमीच्या हौशी मॅरेथॉनला तसेच वरळी डेअरी येथून हॉफ मॅरेथॉन आणि पोलिस चशक मॅरेथॉन सुरु झालीये. गुलाबी थंडीत मुंबईत अबालवृद्ध रस्त्यावर उतरलेत. 42 हजारांहून अधिक धावपटू सहभागी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षीप्रमाणं यंदाही आफ्रिकनं धावपटूंचंच मॅरेथॉनमध्ये वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, रियो ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठणारी ललिता बाबर आणि नाशिकची कविता राऊत आपल्याला यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना दिसणार नाहीत. मात्र खेतराम, मोहम्मद युनुस, ईलाम सिंग, अमनदिप कौर, मोनिका आथरे, ज्योती गावडे आणि स्यामली सिंगसारखे भारतीय धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना आपल्याला दिसतील. 


यंदाही ही मॅरेथॉन पाच गटांमध्ये आयोजत करण्यात आलीय. तीन लाख 77हजार अमेरिकन डॉलर एवढं बक्षीस असणारी ही आशियातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणूनही ओळखली जाते. सेलिब्रिटींची उपस्थिती हे मुंबई मॅरेथॉनचं खास वैशिष्ट्य आहे.