मुंबई : महापालिकेच्या महापौरांची निवड ८ मार्चलाच १२ वाजता होणार आहे. ४ मार्चला महापौरपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८ मार्चला महापौरपदाच्या निवडीपूर्वी काही वेळ अगोदर अर्ज माघार घेता येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर तडकाफडकी महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख बदलण्यात आली.


९ मार्च ऐवजी निवडणूक ८ मार्चलाच होणार आहे. ८ मार्चलाच २०१२ च्या जुन्या नगरसेवकांची मुदत संपतेय. त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या जुने नगरसेवक पदावर असले तरी चिटणीस विभागाकडून जुन्या नगरसेवकांना सभागृह बैठकीसाठीचे निमंत्रणच पाठवले जाणार नाही. केवळ, २०१७ च्या नव्याने निवडून आलेल्या नव्या नगरसेवकांनाच निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.