मुंबई : सकाळपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर सुरु असलेली वाहतुकीची कोंडी अखेर फुटली आहे. या मार्गावरील वाहतूक आता सुरळीत सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकेंडला लागून आलेल्या सुट्यांमुळे या महामार्गावर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती. खंडाळ्याजवळील बोरघाट, तसेच खालापूर टोल नाक्याजवळ वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.


 मात्र आता या महामार्गावरील वाहूक सुरळीत सुरु झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर प्रत्येक शनिवारी-रविवारी अशी परिस्थिती तयार होते. वाहतूक कोंडी या दिवशी ठरलेली असते.