मुंबई : मुख्यमत्र्यांचा टोलमुक्तीचा नारा फोल असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते आणि टोल अभ्यासकांनी केलाय. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलची निर्धारित रक्कम 2016मध्येच वसूल झाल्याचा दावा टोल अभ्यासकांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तरीही टोलची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळं मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि एमएसआरडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण मोपलवारांविरोधात एसबीसीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


टोलमुक्तीचा नारा फोल


पारदर्शिपणाचा जो आव आणलेला आहे तो संपूर्ण खोटा आहे. केवळ कंत्राटदार धार्जिने धोरण असल्याचे सध्या तरी दिसत आहेत. त्यामुळे यामागे काही तरी आहे. हाच अपारदर्शिकपणा आहे, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते  यांनी केला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, एमआरडीए यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, आम्हाला जे उत्तर मिळाले आहे ते चुकीची आहे. मात्र, ज्यांच्याविरोधात तक्रार दिले आहे. जर त्यांनी 45 दिवसात उत्तर आले नाही तर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.