रेल्वे मार्गालगत झोपडपट्टीधारकांना अच्छे दिन, होणार पुनर्वसन
शहरातील रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपड्यांचं SRA अंतर्गत पूनर्वसन होणार आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारकांना अच्छे दिन येणार आहेत.
मुंबई : शहरातील रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपड्यांचं SRA अंतर्गत पूनर्वसन होणार आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारकांना अच्छे दिन येणार आहेत.
मुंबईत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिवांची बैठक झाली. या बैठकीत झोपड्यांचे SRA अंतर्गत पुनर्वसन करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली.
रेल्वे आणि SRA यांच्या भागिदारीत कंपनी स्थापन करून ही योजना राबवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव आता रेल्वे बोर्डाला देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे तब्बल १२ लाख कुटुंबियांना फायदा होणार आहे.