दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला, ५१२ विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात
मुंबईतल्या दहिसरच्या घरंटन पाड्यातल्या दोन नंबर शाळेतल्या दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईतल्या दहिसरच्या घरंटन पाड्यातल्या दोन नंबर शाळेतल्या दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार आहे. एसएसएसी बोर्डानं ही माहिती दिलीय. या उत्तरपत्रिका नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांच्या आहेत याची माहितीही शाळेकडे नाही. त्यामुळं आता ५१२ विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे.
या उत्तरपत्रिका गायब झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी दहिसर पोलिसात गुन्हा दाखल केलाय. शाळेमधून तीन एप्रिलला दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्या आहेत. मात्र बोर्डाबरोबर चर्चा झाल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बोर्डाकडून परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी सर्व शाळांमध्ये पाठवल्या जातात. मात्र या शाळेत आलेल्या विज्ञान, संस्कृत, इतिहास अशा तीन विषयाचे एकूण 512 विद्यार्थांच्या उत्तर पत्रिका चोरीला गेल्याचं उघड झालं आहे.