मुंबई : यापुढे सर्व उत्तरत्रिका ऑनलाईनच तपासल्या जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुंबई विद्यापीठानं केली आहे. येत्या एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर संजय देशमुख यांनी ही घोषणा केली आहे.


402 परीक्षांद्वारे तब्बल साडे 19 लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीसाठी येणार आहेत. त्या सर्व उत्तरपत्रिकांचं ऑनलाईन ऍसेसमेंट होणार आहे.