दिपाली जगताप-पाटील, मुंबई :  मुंबई विद्यापीठ बीएसस्सी इन एव्हिएशन हा कोर्स सुरु करणार आहे. ज्यासाठी विद्यापीठ स्वत:चं विमान घेण्याच्या विचारात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसा प्रस्ताव आज विद्यापीठात मॅनेजमेंट काउंसीलच्या बैठकीत मांडण्यात येणार असून त्यावर चर्चा होणारेय. तसंच यासाठी बॉम्बे फ्लाईंग क्लबसोबत करार केला जाण्याचीही शक्यता आहे. 


एव्हिएशन शिकणा-या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिकण्यासाठी कोणतीही अडचण येवू नये यासाठी कलिना कॅम्पसमध्येच सर्व सोयी सुविधा पुरवण्याच्या तयारीत विद्यापीठ असून यासाठीच मुंबई विद्यापीठ स्वत:च विमान घेत असल्याची चर्चा सुरू आहे.