मुंबई : राज्यातल्या महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय. मुंबई महापालिकेची प्रभाग रचना, आरक्षण सोडत आणि इतर सुनावणीचा कार्यक्रम जाहीर झालाय. पुढल्या वर्षी म्हणजेच 2017 च्या फेब्रुवारीत निवडणूक अपेक्षित आहे.  त्यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भातली कार्यवाही 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 नोव्हेंबरला प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना काढली जाणार आहे. मुंबई महापालिकेसारखाच राज्यातल्या इतर नऊ महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाचं वेळापत्रक असण्य़ाची शक्यता आहे.  मुंबईत वॉर्डच्या पुनर्रचनेमुळं अनेक वॉर्ड गायब होण्याची शक्यता आहे. तसंच काही नवीन वॉर्डंस निर्माण होणार असल्यानं विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांची धाकधूक वाढलीय.