मुंबई : क्रिकेट खेळताना बॅट, स्टम्प मारून मुलाची हत्या करण्यात आली आहे, क्रिकेट खेळताना वाद झाल्यानंतर, हा वाद १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना मुंबईतील धारावी परिसरात घडली आहे. हत्येप्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्या झालेल्या मुलाचं नाव आमीर हुसेन अन्सारी असं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावीतील गांधी मैदानात शनिवारी दुपारी काही मुलं क्रिकेट खेळत होती. त्यावेळी कुठल्यातरी कारणावरून त्यांच्यात भांडण सुरू झालं आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं. बॅट आणि स्टम्प घेऊन एका टोळक्यानं आमीर हुसेन अन्सारीला बेदम मारहाण केली. 


थेट डोक्यालाच मार लागल्यानं तो खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. धारावी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकणी दोन १६ वर्षीय मुलांना ताब्यात घेतलं आहे. नेमकं कुठल्या कारणावरून हे भांडण झालं, मैदानावरच काही घडलं होतं की आणखी कुठला वाद होता, याची चौकशी अद्याप सुरू आहे.