मुंबई : देशात आणि राज्यात काँग्रेसला स्वीकाराव्या लागणाऱ्या पराभवाबद्दल बोलताना देशात मोदींची लाट आहेच, पण त्यात काही शंका असल्याचं म्हटलंय.


देशात मोदींची लाट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मोदींची लाट आहेच... मी काहीही बोललो तर लोक मला मुर्खात काढतील... मोदी लाट आहेच पण त्यात काही शंका आहेत' असं राणेंनी म्हटलंय. 


आपणं काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाबद्दल आत्ताच बोलणार नाही... जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की बोलू...' असं म्हणतानाच आपण, राहुल गांधी, सोनिया गांधींवर नाराज नसून राज्यातील काही नेत्यांवर नाराज असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय.


काँग्रेसमध्ये येणं ही चूक?


काँग्रेसमध्ये येणं ही चूक आहे असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न विचारल्यावर अगदी थंडपणे राणेंनी 'माणसाचा स्वभाव आहे... आपली चूक असली तरी ती तो मान्य करत नाही' असं उत्तर दिलं. चूक मान्य करत नसलो तरी चुका सुधारण्याची आपली सवय असल्याचंही त्यांनी म्हटलंय.


मुख्यमंत्र्यांची भेट...


नारायण राणेंनी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या केबिनमध्ये जाऊन भेट घेतली... उल्लेखनीय म्हणजे, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले शिवसेना नेते दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत हे दुसऱ्या केबिनमध्ये मुख्यमंत्र्यांची वाट पाहत थांबले होते... त्यांना वेटिंगवर ठेवत फडणविसांनी राणेंची घेतलेली भेट राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरली.