मुंबई : मी पहिला व्यावसायिक नंतर राजकारणी आहे आणि त्यामुळेच टिकलो आहे, त्यामुळे मराठी माणसाने भावनांचा विचार न करता विकासाचा विचार करावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. वाडी वस्ती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दैनिक प्रहारमध्ये प्रसिद्ध झालेल्या 'वाडी-वस्ती' या सदरातील लेखांचा संग्रह पुस्तक रुपाने वाचकांच्या भेटीला येत आहे. या लेख संग्रहाचे 'वाडी-वस्ती'  या नावाचे पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार अरुण साधू आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात विविध क्षेत्रातील ९९ मान्यवरांनी आपल्या वाडी वस्तीचे वर्णन शब्दरुप केले आहेत. डिंपल पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकांची संकल्पना मुकुंद कुळे यांची आहे.



नारायण राणेंमधील बिझनेसमन बोलला...


- महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे साहित्याचा बॅकलाॅग नाही
- औदार्यामुळे मराठी माणसाचे मुंबईतील टक्केवारी कमी
- मी लहानपणी मुंबई सोडली १९९० ला राजकारणी झालो तेव्हा मला कोकणाची काहीच माहिती नव्हती
- मी कोकणातील लेखकांची पुस्तके वाचली, सगळ्यांनी कोकणाचे वर्णन केले, मातीचे वर्णन केले
- पण कोकणाच्या मातीत काय करायला हवे हे कोण लिहित नाही
- कोकणातला आंबा आम्ही ५ रुपयांना विकतो आणि गुजरातमध्ये एका कंपनीत प्रोसेस करून ६० रुपयांना विकला जातो
- मराठी माणसाने व्सवहार ज्ञान आत्मसात करायला हवे
- मुंबई आर्थिक राजधानी पण आर्थिक व्यवहारात मराठी माणसाचा टक्का कमी
- आपण भावनांचा विचार करतो, पण विकासाचा विचार करत नाही
- मी पहिला व्यावसायिक नंतर राजकारणी
- मी शिवसेनेत एका माणसाचा पाठलाग केला, मनोहर जोशींचा
- व्यवसाय करण्यासाठी हा पाठलाग केला
- ते मला व्यावसायावरील पुस्तके वाचायला पाठवायचे
- साहित्याचा माध्यमातून ज्ञान हे विकासाच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचले पाहिजे