विधानपरिषद सभापतीपदी रामराजे निंबाळकरांची बिनविरोध निवड
विेधान परिषद सभापतीपदासाठी रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड झालीय.
मुंबई : विेधान परिषद सभापतीपदासाठी रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड झालीय. तर दुसरीकडे खडसेंच्या जागी सभागृह नेतेपदी चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आलीय.
विधान परिषदेचे सभापती म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव राष्ट्रवादीकडून निश्चित करण्यात आलं होतं.
सभापतीपदाचा उमेदवार ठरवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठक बोलावली होती. सभापतीपदाकरता सुनील तटकरे आणि हेमंत टकले यांच्या नावाची चर्चा होती. मात्र बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव निश्चित झालंय.