राष्ट्रवादीची वेट अँड वॉचची भूमिका...
मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर होईल हा सध्याच्या स्थितीतील सर्वात मोठा राजकीय वर्तुळात चर्चिला जाणारा विषय आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तीन चार दिवस आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
मुंबई : मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर होईल हा सध्याच्या स्थितीतील सर्वात मोठा राजकीय वर्तुळात चर्चिला जाणारा विषय आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तीन चार दिवस आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
आज मुंबईच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी सुनील तटकरे बोलत होते. ते म्हणाले, भाजप आणि शिवसेनेला समान अंतरावर ठेवणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कोणाला मदत करणार नाही. सत्तेसाठी आतूर झालेले सेना भाजप एकत्र येतील असे मला वाटते. सेना सत्तेतून पडण्याचे धाडस करणार नाही.
राज्यातील नोटीस पिरीयड कुठे आहे. राजीनाम्याचा कागद ओला झाला की फाटला असा टोलाही तटकरेंनी मारला.