मुंबई : नीट परीक्षेच्या ड्रेस कोडमध्ये बुरख्याला परवानगी देण्यात आलीय. गेल्यावर्षी परवानगी न दिल्यानं वाद झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, तपासणीसाठी परीक्षा सुरु होण्याच्या अडीच तास आधी येण्याच्या सीबीएसई बोर्डानं सूचना दिल्यात. नीट परीक्षेसाठी सीबीएसईचा विशेष ड्रेस कोड ठेवण्यात आलाय. 


मात्र, फुल स्लीव्हला परवानगी देण्यात आलेली नाही. शूज आणि सँडेलऐवजी स्लिपर घालावी. आणि फिक्या रंगाचे कपडे घालण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 


यंदा नीट मे महिन्यात होणार आहे. गेल्यावर्षीपासून सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर अचानकसुरु करण्यात आलेल्या नीट परीक्षेची भिती विद्यार्थ्यांच्या मनात कायम असून बोर्डाने आता परीक्षेसाठीही ड्रेसकोड जारी केलाय. 


'नीट' ड्रेसकोड 


विद्यार्थ्यांना फुल्ल स्लिव्ह्सचे कपडे घालता येणार नाही
भडक रंगाचे कपडे घालण्याची परवानगीही नाही 
शूज ऐवजी स्लिपर घालून येण्याच्या सूचना 
तर मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालून येण्याची परवानगी