मुंबई :  भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय चलनाच्या नोटेवर एकतर भारतीय स्मृतीचिन्हांचे किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र आहे. पण अशी एक नोट समोर आली आहे, त्यात आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांचा फोटो होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ जानेवारी २०१० मध्ये ही नोट सार्वजनिक करण्यात आली. हा दिवस सुभाषचंद्र बोस यांच्या ११३ व्या जयंतीचा होता. 


कधी छापली होती ही नोट..


सुभाषचंद्र बोस यांचा फोटो असलेली ही नोट एप्रिल १९४४ रोजी छापण्यात आली आहे. अनेक इतिहास तज्ज्ञांच्यामते सुभाष बाबूंनी १९४४ मध्ये आझाद हिंद बँकेची स्थापना केली होती. त्याला बँक ऑफ इंडिपेन्डन्स देखील म्हणायचे. या बँकेची स्थापना रंगून म्हणजे सध्याचे म्यानमारमधील यॅगॉन आहे. 


जगभरातील भारतीय समुदायाने पाठवलेला पैसा मॅनेज करण्यासाठी ही बँक स्थापन केली होती. त्याद्वारे ही नोट काढण्यात आली होती. 


कितीची होती नोट...


ही नोट १ लाख रुपयांची होती. त्यावर नेताजींचा फोटो होता. डाव्या बाजूला स्वतंत्र भारताचा नकाशा होता. त्यावर हिंदीतून स्वतंत्र भारत असे लिहिले होते. मध्यभागी जय हिंद लिहिले होते. तसेच त्याच्या खाली  “I promise to pay the bearer the sum of one Lac' असे इंग्रजीतून लिहिले होते.