नवी मुंबई : 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिक तासनतास रांगा लावत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासाठी कागदोपत्री सोपस्कर पार पडल्यानंतर नागरिकांना हातात 2000 हजाराची नवी नोट हाती पडत आहे. मात्र नवी मुंबईत राहणाऱ्या अशोक शेषवर्य यांना मिळाली चक्क चिल्लर आणि तीदेखील दोन रुपयाच्या नाण्यांची...


सीबीडीमधल्या स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या शाखेत ते चार हजार रुपये घेण्यासाठी गेले होते. तिथे काही तास खर्च करुन त्यांचा नंबर लागला. त्यावेळी त्यांना काऊंटवर चार हजार रुपयांची रक्कम मिळाली ती चिल्लरच्या रुपात...