नितीन गडकरी आज मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेणार भेट
500, 1000 नोंटाबंदी निर्णयानंतर शिवसेनेची भाजपच्या धोरणावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच सहकारी बॅंका आणि पतसंस्था यांच्यावर घातलेल्या निर्बंधाबाबतही शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल चढवला होता. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आजच्या भेटीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, गडकरी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जात असल्याचे सांगितले आहे.
मुंबई : 500, 1000 नोंटाबंदी निर्णयानंतर शिवसेनेची भाजपच्या धोरणावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच सहकारी बॅंका आणि पतसंस्था यांच्यावर घातलेल्या निर्बंधाबाबतही शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल चढवला होता. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आजच्या भेटीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, गडकरी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जात असल्याचे सांगितले आहे.
नोटाबंदी विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला विरोधकांकडून लक्ष करण्यात येत आहे. त्यातच भाजचा सहकारी आणि सत्तेत सहभागी असलेला पक्ष शिवसेनाही मागे नाही. विरोधकांबरोबर शिवसेना असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तसेच आज संसदेत सहकारी बॅंका आणि पतसंस्था यांच्यावर लादलेल्या निर्बंधाबाबत चर्चा करण्यासाठी आणि या विरोधात मतदान करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे शिवसेनाही विरोधकांबरोबर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडकरी उद्धव ठाकरे यांनी भेट घेत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या मुलीच्या विवाहाची लग्न पत्रिका देण्यासाठी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, निमंत्रण पत्रिका एक केवळ निमित्त आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे या भेटीनंतर शिवसेनेचा विरोध मावळतो का, याकडे लक्ष लागले आहे.