मध्य रेल्वेच्या प्रवाशांचं गारेगार प्रवासाचं स्वप्न भंगलं
मुंबईत मध्य रेल्वेच्या प्रवाशांचं गारेगार प्रवासाचं स्वप्न भंगलंय. एसी लोकल धावण्यासाठी मध्य रेल्वे सक्षम नसल्याचं मध्य रेल्वेच्याच एका पत्रातून उघड झालंय.
मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेच्या प्रवाशांचं गारेगार प्रवासाचं स्वप्न भंगलंय. एसी लोकल धावण्यासाठी मध्य रेल्वे सक्षम नसल्याचं मध्य रेल्वेच्याच एका पत्रातून उघड झालंय.
एसी लोकलची उंची सध्याच्या लोकलपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कुर्ला ते सीएसटी दरम्यान असलेल्या कमी उंचीच्या पूलाखालून या एसी लोकल धावू शकत नसल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय. मध्य रेल्वे मार्गाऐवजी पश्चिम रेल्वे मार्गावरही एसी लोकल चालवावी असंही सुचवण्यात आलंय.
चेन्नईच्या कारखान्यातून एसी लोकल पाच एप्रिलला मुंबईत दाखल झाली. मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्येच राहिली.. कर्जत ते खोपोली दरम्यान एसी लोकलची चाचणी झाली नाही.