एव्हरेस्ट वीर रफिकला अजूनही सरकारकडून मदत नाही
राज्य पोलीस दलातली एकमेव एव्हरेस्ट वीर रफिक शेखच्या एव्हरेस्ट वारीला आता वर्ष पूर्ण
मुंबई : राज्य पोलीस दलातली एकमेव एव्हरेस्ट वीर रफिक शेखच्या एव्हरेस्ट वारीला आता वर्ष पूर्ण झालं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी केलेली मदतीची घोषणा अद्यापही प्रत्यक्षात आलेली नाही. या जवानाचा एव्हरेस्ट मोहिमेचा खर्च राज्य सरकार देईल असं मुख्यमंत्र्यांनी सात जून 2016 रोजी जाहीर कार्यक्रमात म्हटलं होतं. आता या घटनेला १० महिने होत आले.
रफिकला पण एक कवडीही मिळालेली नाही. रफिकला एव्हरेस्ट मोहिमेसाठी 52 लाख रुपये खर्च आला. कर्ज काढून रफीकनं हा खर्च भागवला. कर्ज फेडण्यासाठी रफीकचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मंत्रालयात मदतीसाठी खेटेही घालतो आहे. पण त्याला यश काही येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पोलीस नाईक पदावर कार्यरत रफिकचा आवाज ऐकून काही कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.