शिवसेनेच्या `त्या` आमदार-खासदारांनी राजीनामा दिला नव्हता
सामनातल्या व्यंगचित्रामुळे नाराज झालेले आमदार संजय रायमुलकर आणि आमदार शशिकांत खेडेकर आणि खासदार प्रतापराव जाधव मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं होतं.
मुंबई : सामनातल्या व्यंगचित्रामुळे नाराज झालेले आमदार संजय रायमुलकर आणि आमदार शशिकांत खेडेकर आणि खासदार प्रतापराव जाधव मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं होतं.
या तिघांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी चर्चा करुन मार्ग काढल्याची माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिलीय.
यापैकी कोणत्याही आमदार-खासदाराने राजीनामा दिला नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच सामनातील व्यंगचित्र शिवसेनेची भूमिका नसल्याचंही देसाई यांनी सांगितलं.
शिवाय शिवसेना पहिल्यापासून मराठा मोर्चाच्या पाठिशी असल्याचा पुनरुच्चार देसाई यांनी केलाय.