मुंबई : मुंबईतील सोमवारचा रिक्षा-टॅक्सीचा संप मागे घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेकायदेशीर पद्धतीनं मुंबईत चालणाऱ्या ओला आणि उबेर टॅक्सींवर कारवाईच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. जय भगवान ऑटो टॅक्सी संघटनेनं या संपाची हाक दिली होती. मात्र रावतेंसह झालेल्या बैठकीनंतर 1 सप्टेंबरपर्यंत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा संप मागे घेण्यात आल्यानं मुंबईकरांना तूर्त दिलासा मिळाला आहे.