महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरचा अधिभार रद्द
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरचा राज्य अधिभार रद्द करण्यात आलाय. मध्यरात्रीपासून हा अधिभार रद्द करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलंय. त्यासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची परवानगी मिळल्याचं परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय.
मुंबई : महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरचा राज्य अधिभार रद्द करण्यात आलाय. मध्यरात्रीपासून हा अधिभार रद्द करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलंय. त्यासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची परवानगी मिळल्याचं परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय.
राज्यात डीझेलवर 91 पैसे तर पेट्रोलवर 1 रुपया 12 पैसे अधिभार केंद्र सरकारनं रद्द केलाय. त्यामुळे काल मध्यरात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढले असले, तरी राज्यात मात्र दर कमी झाले आहेत. केंद्र शासनाने राज्य विशेष अधिभारात केलेल्या कपातीमुळे महाराष्ट्रात डिझेल प्रती २ रुपये २० पैसे व पेट्रोल २ रुपये ५० पैसे स्वस्त झाले आहे.