झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक आणि वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्या अडचणीत वाढ झालीये.
मुंबई : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक आणि वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्या अडचणीत वाढ झालीये. मुंबईतल्या PMLA विशेष न्यायालयानं त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलंय. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी झाकीरवर कारवाई करण्यात आलीये.
अंमजबजावणी संचालनालयानं झाकीरला चार वेळा चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. मात्र प्रत्येक वेळी तो गैरहजर राहिल्यानं EDनं अटक वॉरंटसाठी कोर्टात धाव घेतली होती.
झाकीर नाईक सध्या संयुक्त अरब अमिरातींमध्ये आहे आणि त्या देशासोबत भारताचा गुन्हेगार हस्तांतरण करार आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयामार्फत झाकीरच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणणं तपास यंत्रणांना शक्य होणार आहे. झाकीरवर अफरातफरीसह 'आयसीस'ला आर्थिक मदत, धार्मिक भावना भडकावणं, तरुणांचं ब्रेनवॉश करणं आदी अनेक आरोप आहेत.