मुंबई महापालिकेतील अमराठी नगरसेवकांची संख्या ७३वर
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला जरी बहुमत मिळाले नसले तरी त्यांच्या नगरसेवकांची संख्या मात्र वाढलीये. यासोबतच यंदाच्या निवडणुकीत अमराठी नगरसेवकांच्या संख्येतही वाढ झालीये.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला जरी बहुमत मिळाले नसले तरी त्यांच्या नगरसेवकांची संख्या मात्र वाढलीये. यासोबतच यंदाच्या निवडणुकीत अमराठी नगरसेवकांच्या संख्येतही वाढ झालीये.
पाच वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेतील अमराठी नगरसेवकांची संख्या ६१ होती. ती आता ७३वर पोहोचलीये. यातील सर्वाधिक अमराठी नगरेसवक हे भाजपाचे आहेत.
भाजपातील यंदा ३६ नगरसेवक अमराठी आहेत. तर शिवसेनेकडून चार अमराठी नगरसेवक निवडून आलेत. अमराठी नगरसेवकांमध्ये सर्वाधिक संख्या आहे ती गुजरातींची.
या निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवलेले २३ गुजराती नगरसेवक निवडून आले तर १२ उत्तर भारतीय आणि एक दक्षिण भारतीयाचा समावेश आहे.