मुंबई : महागाईचा चटका सहन करत असलेल्या मुंबईकरांना आता मांसाहार करणंही महागात पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत मटणाचे दर सुमारे २५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे देवनार पशुवध गृह येथे आणण्यात येणाऱ्या जनावरांसमवेत लायसन्सच्या किंमतीत वाढ करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विधी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे. 


या प्रस्तावावर बुधवारी शिक्कामोर्तब होऊन मुंबईमध्ये मांस दरात २५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. स्वस्त आणि उत्तम दर्जाचे मांस देवनार कत्तलखान्यात मिळते अशी ओळख आहे. पण, दिवसेंदिवस वाढणाऱ्या वीजबिलाची रक्कम, पाणीबील तसेच सरकारी टॅक्सच्या दरात होणारी वाढ आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खर्चासह देवनार कत्तलखाना चालवणे कठिण होत आहे.


त्यामुळेच, इथल्या शुल्कात ६ ते २५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव कत्तलखान्याच्या महाव्यवस्थापकांनी पालिकेकडे पाठवला आहे.