मुंबई : नोटबंदीनंतर देशात सुरु असलेल्या परिस्थितील पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. त्यांनी नोटबंदीचा जो निर्णय घेतला तो चांगला आहे. मात्र, त्यांना पर्यायी व्यवस्था करता आलेली नाही. ते यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरुन, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. काळापैसा रोखण्याच्या लढाईत राष्ट्रवादी सरकारसोबत आहे. मात्र कोणत्याही तयारीविनाच नोटाबंदीचा निर्णय लागू केल्याचा आरोप, शरद पवारांनी केला. नोटाबंदीमुळे शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाचं मोठं नुकसान झाल्याची टीकाही पवारांनी केली.


नोटाबंदीचा शेती व्यवसायाला फटका बसला आहे. सरकारने पर्यायी व्यवस्था करायला हवी होती, पण त्यांनी ती केलेली नाही. दोन हजारांच्या नोटांमुळे सुट्ट्या पैशाचा प्रश्न गंभीर बनला, असे पवार म्हणालेत.प्रत्येक गोष्ट आपणच करत असल्याचा आव आणणं चुकीचं असल्याचा टोलाही पवारांनी मोदींना लगावला.