मुंबई : ड्रायव्हिंग करताना तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, लर्निंग लायसन्स, आरसी बुक यांसारखी आवश्यक कागदपत्रं जवळ बाळगणं गरजेचं असतं... परंतु, बऱ्याचदा या गोष्टी चुकून घरीच विसरून आपण गाडी घेऊन बाहेर पडतो... आणि त्यामुळे आपल्याला दंडही भरावा लागतो... होय ना... पण आता मात्र तुम्हाला यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण, तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी विसरलात तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. कारण, तुमच्या मदतीसाठी आता डिजिलॉकर तयार आहेत. 


डिजिलॉकरच्या मदतीनं तुम्ही तुमच्या  ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांना डिजिटल पद्धतीनं सुरक्षित ठेवू शकाल. ट्राफिक पोलिसांनी विचारणा केल्यास तुम्हाला हीच डिजिटल स्वरुपातील कागदपत्रं त्यांना दाखवता येतील. 
 
डिजीलॉकर तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेटस् सुरक्षित ठेवण्याची सुविधा देतात. तुम्हाला डिजीलॉकरमध्ये साइन इन करण्यासाठी आधार कार्ड नंबर आणि आधार कार्डमध्ये रजिस्टर्ड मोबाईल नंबरची आवश्यकता असेल. 


चौकशी दरम्यान, डिजीलॉकरमध्ये डॉक्युमेटस् न मिळाल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.