हॉटेलमध्ये आता ग्लास भरून पाणी मिळणार नाही
पाणी बचतीसाठी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांची संघटना `आहार`ने एक छोटे पण महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
मुंबई : (अमित जोशी, झी २४ तास) पाणी बचतीसाठी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांची संघटना 'आहार'ने एक छोटे पण महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
हॉटेलमध्ये ग्राहकांना पाणी देतांना पूर्ण ग्लास भरण्याऐवजी पाण्याच्या जागेसह रिकामे ग्लास ठेवण्याचे आवाहन 'आहार'ने हॉटेल व्यावसायिकांना केले आहे.
यामुळे आवश्यक तेवढे पाणी ग्राहक हा पाण्याच्या जगामधून घेईल. तसंच तहान आहे, तेवढेच पाणी वापरण्याचे भान ग्राहकाला येईल अशी यामागची संकल्पना आहे.
मुंबईत सुमारे 25 हजार हॉटेल्स असून आहार संघटनेशी सबंधित 8 हजार 500 हॉटेल्स आहेत. प्रत्येक हॉटेल हे दररोज किमान १ हजार लीटर पेक्षा पाणी सहज वापरते.
पाणी बचतीच्या नव्या तंत्रातून किमान ३० टक्के पाणी वाचेल असा दावा 'आहार' संघटनेचे अध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी केला आहे. त्यापेक्षा पाणी बचतीचे भान हे ग्राहकांबरोबर हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा येण्यास यामुळे मदत होणार आहे.