विजय मल्ल्या अखेर `फरार` घोषित
उद्योगपती विजय मल्या यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. भारतीय बॅंकांची तब्बल ९ हजार कोटी रुपयांचं कर्जे थकवून विजय मल्ल्या रफ्फूचक्कर झाले आहेत.
मुंबई : उद्योगपती विजय मल्या यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. भारतीय बॅंकांची तब्बल ९ हजार कोटी रुपयांचं कर्जे थकवून विजय मल्ल्या रफ्फूचक्कर झाले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईच्या विशेष न्यायालयात मल्ल्या यांना फरार घोषित करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, आयडीबीआय बॅंकेने मल्ल्या यांच्या १ हजार ४११ कोटी रुपये किमतीच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर टाच आणली आहे. बॅंकांची कर्जे बुडवून मल्ल्या मार्च महिन्यापासून लंडनला आहे.
एकापेक्षा अधिक अटक वॉरंट आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अजामीनपात्र अटक वारंट असल्याने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील कलम ८२ खाली मल्ल्या यांना फरार घोषित करण्यात आले आहे.