मुंबई : मुंबई पालिकेच्या रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात कमर्चा-यांनी केलेल्या पिंगा डान्सचा व्हीडिओ व्हायरल झालाय. 


या डान्समध्ये 20 परिचारिका सहभागी झाल्याचा आरोप आहे. या कार्यक्रमासाठी तब्बल 100 रुग्णांना उपचाराशिवाय माघारी धाडण्यात आल्याचाही आरोप होतोय. 
 
हा प्रसंग दोन महिन्यापूर्वीचा असला, तरी यानिमित्तानं पालिका रुग्णालयातील हलगर्जी पुन्हा एकदा अधोरेखित होतोय.