मुंबई :  ओला आणि उबेर या कंपन्यांनी आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप करत मुंबईतील ओला उबेर चालक आणि मालकांनी संपाच्या तयारी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत 50 हजाराहून ही अधिक ओला आणि उबेरसाठी काम करणाऱ्या गाड्या आहेत.


ओला आणि उबेर या कंपन्यांनी सुरवातीला जी आश्वासन दिली होती त्याच्या पासून आता पाठ फिरवली असल्याचा आरोप  चालक आणि मालकांनी केला आहे. 


आम्हाला त्रास देऊन आमच्या गाड्या बाहेर काढून ओला आणि उबेरला स्वतःच्या गाड्या आमच्या जागी लावायच्या आहेत, असे चालकांचे म्हणणे आहे. 


गेल्या महिन्या भरात दिल्ली, चेन्नई, तेलंगणा, हैदराबाद, केरळ या ठिकाणी ओला आणि उबेर चालकांनी संप केला होता. 


शासनाने आमच्यासाठी सिटी टॅक्सी स्कीम आणावी,  अशी मागणी ओला उबेर चालकांनी केली आहे.