मुंबई : नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदमबरम यांनी जोरदार टिका केलीय. ज्यांनी निर्णय घेतलाय त्यांना आजार काय आहे आणि त्यासाठी कोणती सर्जरी करायची हेही माहित नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच नोटाबंदीचा निर्णय हा मानवानं स्वतःच रचलेली शोकांतिका असल्याची टीका चिदंबरम यांनी केलीय. एवढ्यावरच न थांबता नोटाबंदीचा निर्णय घेणा-यांना अर्थशास्त्राच्या शाळेत पाठवायला हवं, अशा शब्दांत त्यांनी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसमोरच मोदींवर तोंडसुख घेतलं आहे. 


मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाने खास नोटाबंदी याविषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. काळा पैसा हा या निर्णयामुळे संपणार नसून ,जोपर्यंत नागरिक काळा पैसा मागणं बंद करणार नाहीत तोपर्यंत ही समस्या राहणार असल्याचं ते म्हणाले.