पद्मश्री राम सुतार यांनी बनवली महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक भूमीपुजन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ डिसेंबरला याचं भूमीपुजन होणार आहे.
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक भूमीपुजन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ डिसेंबरला याचं भूमीपुजन होणार आहे.
पद्मश्री राम सुतार यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती बनवली आहे. या पुतळ्याला महाराष्ट्र सरकारने तत्वत मंजूरी दिली आहे. ४०० फूट उंचीचा पुतळा असेल तर हा पुतळा बसवण्यासाठी किमान दोन ते अडीच वर्ष लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.