तेजस एक्सप्रेसमधील हेडफोन प्रवाशांनी केले लंपास
प्रवाशांच्या मनोरंजनासाठी तेजस एक्सप्रेसमध्ये एलईडी स्क्रिन लावलेत. त्यावर गाणी आणि चित्रपट पाहता येतात. मात्र, हे ऐकण्यासाठी जे हेड फोन आहेत. तेच काही प्रवाशांनी प्रवासात लंपास केले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे हे हेड फोन लंपास होऊ नयेत म्हणून रेल्वे प्रशासन काय शक्कल लढवणार हे पाहावं लागणार आहे.
मुंबई : प्रवाशांच्या मनोरंजनासाठी तेजस एक्सप्रेसमध्ये एलईडी स्क्रिन लावलेत. त्यावर गाणी आणि चित्रपट पाहता येतात. मात्र, हे ऐकण्यासाठी जे हेड फोन आहेत. तेच काही प्रवाशांनी प्रवासात लंपास केले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे हे हेड फोन लंपास होऊ नयेत म्हणून रेल्वे प्रशासन काय शक्कल लढवणार हे पाहावं लागणार आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा मार्गावर धावणारी बहूचर्चित तेजस एक्सप्रेस नुकतीच सुरू झाली अत्याधुनिक,जलद आणि सर्व सोयी सुविधा असलेल्या तेजस एक्सप्रेसचं प्रवाशांनीही स्वागत केलं आहे. शिवाय तेजस एक्सप्रेसच्या बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.