नवी मुंबई : खारघरमध्ये पाळणाघरात लहान मुलीला झालेल्या मारहाणप्रकरणी तपास  करणा-या अधिका-यांना हटवण्यात आलं आहे. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस निरीक्षक देवीदास सोनवणे यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान पाळणाघराची संचालिका प्रियंका निकम यांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावली गेली. मात्र त्या घरी नसल्यानं, त्यांच्या दरवाजावर ती नोटीस चिकटवण्यात आली.


खारघर मधील पाळणाघरात दहा महिन्याच्या बाळाला जबर मारहाण केल्या प्रकरणी खारघरपोलिसांनी खुनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच पाळणाघराची मालक प्रियंका निकमचा जामीन अर्ज रद्द करण्याबाबत देखील सत्र न्यायालयात गेल्याचे सांगण्यात आले, खारघरमधील पाळणाघरात मुलांची काळजी न घेता त्यांना इजा पोहचविण्याची दुसरी घटना आहे.


नवी मुंबईतील खारघरमध्ये असलेल्या पूर्वा नर्सरी आणि पाळणाघरमध्ये 10 महिन्याच्या बाळाला तेथील काम करणाऱ्या बाईने जबर मारहाण केली, याघटनेने परिसरात संतापाचे वातावरण असून, या पाळणाघरात आपल्या पाल्याला ठेवलेले पालक देखील पुढे आले आहेत, अफसाना शेख ही मुलांना मारत असे, याबाबत अनेक वेळा मुलांनी आणि पालकांना याची सूचना पाळणाघर मालक प्रियंका हिला सांगितले होते अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे,