आमदार रमेश कदमांच्या पोलिसांना शिविगाळ प्रकरणाची चौकशी होणार
आमदार रमेश कदमांनी पोलिसांना शिविगाळ केल्या प्रकरणाची चौकशी होणार आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश पवार यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्ता पडसगलीकरांची भेट घेणार आहेत.
मुंबई : आमदार रमेश कदमांनी पोलिसांना शिविगाळ केल्या प्रकरणाची चौकशी होणार आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश पवार यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्ता पडसगलीकरांची भेट घेणार आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच आहे. आमदार रमेश कदमांनी पोलीसांना अर्वाच्च शिव्या दिल्याची क्लिप व्हायरल झालीय. तपासणीसाठी जेजे रुग्णालयात जात असताना कदम आणि सोबतचे पोलीस यांच्यात वाद झाला. वादादरम्यान कदमांनी शिवराळ भाषा वापरल्याचं क्लीपमध्ये उघड होतंय. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मनोज पवार आणि आमदार यांच्या हि बाचाबाची झाली होती. तेव्हा मनोज पवार यांनी कंट्रोलला फोन लावत अधिक कुमक मागवून घेतली.
नागपाडा पोलिसांनी याप्रकरणी जवाब नोंदवला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपात गेले अनेक महिने रमेश कदम तुरूंगात आहेत. कदमांकडून वारंवार अशीच अरेरावीची भाषा पोलीसांना ऐकावी लागत असल्याचं बोलंल जातंय. दरम्यान आता रमेश कदमांच्या या वागणुकीवर राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी जेलमध्ये जावूनही पैशांचा माज जात नसल्याचं म्हटलं आहे.
पाहा व्हिडिओ