मुंबई : शिवाजी पार्कमधल्या सेल्फी पॉइंटवरून 'सेल्फीश राजकारण' रंगले आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे राजकीय पटलावर पडसाद उमटू लागलेत. शिवसेना आणि भाजपने त्या जागेवर दावा केला होता. मात्र, भाजपने पालिका आयुक्तांना पत्र दिले आणि काही तासातच पालिकेने भाजपला परवानगीचे लेखी पत्रच दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात सेल्फी पॉईंट बंद करण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुचला नाही. त्यामुळे त्यांनी देशपांडे यांच्याशी चर्चा करून त्यांना सेल्फी पॉईंट सुरु ठेवण्याचे आदेश दिले. पक्षाचे अध्यक्षांचा आदेश मनात देशपांडे यांनी आज दुपारी सेल्फी पॉईंट पुन्हा सुरु करीत असल्याचा फलक शिवाजी पार्कात लावला.



नेमकं त्याच वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करून सेल्फी पॉईंट नव्या ढंगात आकर्षक पद्धतीनं सुरू करीत असल्याचे जाहीर केले आणि भेटूया लवकरच सेल्फी पॉईंटवर. या खोचक प्रतिक्रियेतून त्यांनी मनसेला डिवचले. मनसे भाजपमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत अचानक शिवसेनेनंही उडी घेतली. 




शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका विशाखा राऊत संध्याकाळपर्यंत या सेल्फी पॉइंटची जबाबदारी स्वीकारत असल्याचं पोस्टर लावले. आर्श्चयाची बाब म्हणजे परदेशातून आयात केलेल्या एका संकल्पनेवर महाराष्ट्राले राजकीय पक्ष एकमेकांना भिडताना दिसताहेत.