दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :   मंत्रीमंडळ फेरबदल आणि विस्ताराचे वारे वाहू लागले असल्याने सध्या सत्ताधारी पक्षात खळबळ सुरू झाली आहेत. 
 
 या पूर्वी  देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाले तेव्हा मुख्यमंत्र्यांसह १० मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर २०१४ मध्येच पहिला विस्तार शिवसेना सत्तेत आल्यावर करण्यात आला. 
 
 त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे २०१६ मध्ये पुन्हा विस्तार करण्यात आला. यात शिवसेनेचे दोन मंत्री आणि भाजपच्या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. 


 
 पाहा आतापर्यंतच्या फेरबदल आणि विस्ताराच्या तारखा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रीमंडळाचा पहिला शपथविधी - ऑगस्ट 2014 मुख्यमंत्र्यांसह 10 मंत्र्यांचा शपथविधी
मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार - डिसेंबर 2014 शिवसेनेच्या 10 मंत्र्यांसह भाजपाच्या 10 मंत्र्यांचा शपथविधी
मंत्रीमंडळाचा दुसरा विस्तार - जुलै 2016 शिवसेनेच्या 2 मंत्र्यांसह भाजपाच्या 8 मंत्र्यांचा शपथविधी
मंत्रीमंडळाचा तिसरा विस्तार - येत्या 15 दिवसात होणार 


का केला जातोय फेरबदल.... 


 
 मंत्रीपद मिळूनही खराब कामगिरी करणाऱ्या ५ ते ६ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात विष्णू सावरा, राजकुमार बडोले, बबनराव लोणीकर, राजे अंबरिश आत्राम, विद्या ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे. 
 
 येत्या १५ दिवसात या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.  यात मंत्रीमंडळातील कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरीवर होणार बदल होण्याची शक्यता आहे. 
 
 तसेच खांदेपालट करताना जात आणि विभागनिहाय समतोल साधत नव्या चेह-यांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 
 या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोअर कमिटी संदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.