मुंबई :  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चव्हाण यांनी दोघांवर आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री मल्टिमीडिया व्हिजन कंपनीत तावडे आणि करंबळेकर हे भागीदार आहेत. मंत्री असताना एका खाजगी कंपनीचा संचालक असणं बेकायदा असल्याचं चव्हाणांचं म्हणणं आहे. तर श्री मल्टिमीडिया कंपनीत एक पैशाचाही शेअर नसल्याचा दावा तावडेंनी केलाय. 


कपनीत 25 लाखांची गुंतवणूक केली मात्र तो ट्रेड ऍडव्हान्स असल्याचा दावा केलाय. त्यामुळं खूप मोठ्या घोटाळ्याचा शोध लावला अशा अविर्भावात चव्हाणांनी आरोप केल्याचं तावडेंनी सांगितलं.