नोटबंदीच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही आज नोटाबंदीच्या विषयावर विधानसभेत चर्चेचा फड रंगला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेला सुरूवात करताच मोदी सरकारच्या निर्णयाची जोरदार चिरफाड केली आहे.
मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही आज नोटाबंदीच्या विषयावर विधानसभेत चर्चेचा फड रंगला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेला सुरूवात करताच मोदी सरकारच्या निर्णयाची जोरदार चिरफाड केली आहे.
निर्णयाचा उद्देश जरी चांगला असला, तरी नोटाबंदीच्या फतव्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमानी निर्णयाची निंदा केलीय असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. शिवाय नोटाबंदीचा निर्णय हा यूपी आणि पंजाबच्या निवडणूका डोळासमोर ठेवून मोदींनी नोटाबंदी केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय