मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आपली संपूर्ण शिक्षा भोगून गुरुवारी सकाळी येरवाडा तुरुगांतून बाहेर आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९३मध्ये झालेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ४२ महिन्यांची शिक्षा पूर्ण झालीये. तुरुंगाच्या बाहेर कडक सुरक्षाव्यवस्थेत संजय दत्तची पत्नी मान्यता, त्याचे कुटुंबीया, माजी खासदार प्रिया दत्त, राजकुमार हिरानी आले होते. 


संजय दत्तच्या सुटकेनंतर अखेर २३ वर्षांची प्रतीक्षा संपली अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी मी वडिलांना खूप मिस करतेय. हा दिवस पाहण्यासाठी ते असते तर बर झालं असत. २३ वर्षांची प्रतीक्षा संपलीये. यावर काय प्रतिक्रिया देऊ हे मला कळत नाहीये. आनंदही आहे पण त्याचबरोबर भावनिकही झालेय, असे प्रिया दत्तने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.