मुंबई : दहीहंडी सणानिमित्त २५ रोजी राज्य शासनाने मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. तसे राज्य शासनाने परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांतील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना ही सुटी लागू होणार आहे. नोव्हेंबर, १९५८ मधील शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार ही स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 


दरम्यान, दुसरीकडे न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांमुळे दहीहंडी उत्सवावर अनिश्चिततेचे सावट आहे. दहीहंडी समन्वय समितीने राज ठाकरे यांची भेट घेतली असून आज संध्याकाळी समितीतर्फे गोविंदा मंडळांची भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. 


20 फुटांहून अधिक उंचीचे मनोरे लावण्यासाठी तसेच 18 वर्षांखालील मुलांना मनोऱ्यात सहभागी होण्यासाठी न्यायालयाने मनाई केली. तर अधिकाधिक उंचीचे मनोरे लावण्यासाठी प्रसिद्ध असलेले जय जवान मंडळ या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल करणार आहे.