मुंबई : छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच! अशा जाहिराती निवडणुकीपूर्वी भाजपकडून दिल्या जात होत्या. पण भाजपने काल हद्दच केली. मुंबईत निवडणूक जिंकल्यावर देण्यात आलेल्या जाहिरातीत भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होती. याचा धसका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि आज थेट मंत्र्यांचा लवाजमा घेत रायगड किल्ला गाठला. अशीच प्रतिक्रिया सोशल मीडियावर रंगत आहे.


नक्की काय जाहिरातीत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईत काल विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत भाजपने मुंबईकरांना धन्यवाद म्हटले. यात मुंबईकरांचे शतशः धन्यवाद. हमी पारदर्शी कारभाराची विकासाला साथ मिळाली मुंबईकरांची! असा मजकूर आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा फोटो आहे. मात्र, ज्यांच्यानावार मते मागितली त्या महाराजांचा फोटो नव्हता.


ही बाब सोशल मीडियावर जास्त चर्चिली गेली. भाजपला आपली चूक लक्षात आल्यावर काहींनी डोक्यावर हात मारुन घेतला. तोपर्यंत उशीर झाला. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली. आता अच्छे दिन आलेत, मात्र, महाराजांचा यांना विसर पडला. जाहिरातीची बाब विरोधक उचलून धरतील आणि पुन्हा भाजपला जाहिरातीच्या निमित्ताने टार्गेट केले जाईल, अशी भीती व्यक्त होत होती. ही बाब हे हेरुन मुख्यमंत्र्यांनी थेट रायगड किल्ला गाठल्याची चर्चा आता रंगत आहे.