मुंबई : रेल्वेच्या प्रवाशासाठी १३ नोव्हेंबरनंतरचे तिकीट खिडकीवरील आरक्षणाचे निर्बंध हटवण्यात आलेत. मात्र रद्द केलेल्या तिकिटाची रक्कम चेक अथवा ईसीएसद्वारे थेट बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१० हजारांपेक्षा जास्त रकमेच्या तिकिटांसाठी हा नियम लागू करण्यात आलाय. काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी तिकीट खिडकीवर जाऊन रेल्वेची आरक्षित तिकीटं काढण्याची नामी शक्कल लढवली होती. 


एकाच कुटुंबानं काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रवासाचं फर्स्ट क्लास एसीचं तब्बल दीड लाखाचं तिकीट आरक्षित केलं होतं. त्यामुळं हा प्रकार उघड झाला होता. एसी फर्स्ट क्लासच्या आरक्षणात २० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण झाल्याचं पश्चिम रेल्वेच्या लक्षात आलं. त्यानंतर १३ तारखेनंतरच्या तिकिटांच्या आरक्षणावर निर्बंध घालण्यात आले होते.