मुंबई :  वेस्टर्न रेल्वे अप्रेंटीसच्या नोकर भरतीमध्ये न्याय मिळावा या मागणी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून  अप्रेंटीस विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज  ठाकरे यांची कृष्णकुंज, येथे भेटीला आले होते. 


नोकरी भरतीसंदर्भात  विद्यार्थी समस्या बाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्याशी बोलण्याचे आश्वासन विद्यार्थाना राज ठाकरे यांनी दिले. सुमारे अडीच हजार मुले गेली तीन वर्ष पश्चिम रेल्वेत अॅप्रेन्टटीस केली पण नोकरी दिली जात नाही. त्यातुलनेने मध्य रेल्वेत भरती केली जात आहे. यामुळ विद्यार्थी मागणी आहे राज ठाकरे यांनी यात लक्ष घातले तर त्याची समस्या सुटू शकते