मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आज माटुंगा ते चर्चगेट असा मुंबईच्या लोकलच्या फर्स्ट क्लासमधून उभ्याने प्रवास केला. यावेळी त्यांना गर्दीचा सामना करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभू यांच्यासोबत मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनीदेखील हा प्रवास केला. विशेष म्हणजे, कडेकोट बंदोबस्त असतानाही या वेळी प्रवाशांनी प्रभू यांच्याशी संवाद साधला, आणि रेल्वेमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.


माटुंगा वर्कशॉपच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी प्रभू मुंबईत आले आहेत. या कार्यक्रमानंतर त्यांनी दक्षिण मुंबईत जाण्यासाठी उपनगरीय रेल्वेला पसंती दिली आणि सर्वसामान्य लोकांप्रमाने हा प्रवास केला.