मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने दादर माहीम विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी वॉररुम तयार केली असून आज त्याचे उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या प्रसंगी राज ठाकरे पक्षाचे अधिकृत अॅप मनसे अधिकृतच्या फेसबुक अकाऊंटवरून नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.


आज दुपारी 12 वाजता ते नागरिकांसाठी फेसबुक लाईव्ह वरुन संवाद सांधतील. गेल्या महापालिका निवडणुकीत दादर माहीममध्ये पक्षाचा 100 टक्के यशस्वी निकाल लागत सात नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे हा निकाल कायम राहावा यासाठी मनसे महापालिका गटनेते आणि विभागअध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियाचा प्रभावी पणे वापर करण्याची रणनीती आखली आहे.